पीडीइएचे इंग्लिश मीडियम सेकंडरी स्कूल अँड ज्युनिअर कॉलेज, आकुर्डीचा एस.एस.सी. बोर्ड परीक्षेचा निकाल १०० %

*पीडीइएचे इंग्लिश मीडियम सेकंडरी स्कूल अँड ज्युनिअर कॉलेज, आकुर्डीचा एस.एस.सी. बोर्ड परीक्षेचा निकाल १०० %

पुज्य नगरी ऑनलाईन न्यूज 

आकुर्डी : पुणे जिल्हा शिक्षण मंडळाचे इंग्लिश मीडियम सेकंडरी स्कूल अँड ज्युनिअर कॉलेज, आकुर्डीने शैक्षणिक वर्ष २०२५-२६ मधील एस.एस.सी.बोर्ड परीक्षेत १०० % निकालाची उज्ज्वल परंपरा कायम राखत उल्लेखनीय यश संपादन केले आहे. विद्यालयातील सर्व विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून विद्यार्थ्यांनी उत्कृष्ट गुणवत्तेसह यश मिळवत विद्यालयाच्या व संस्थेच्या नावलौकिकात भर घातली आहे.

शैक्षणिक वर्ष २०२५-२६ इयत्ता दहावीचे एकूण ६६ विद्यार्थी एसएससी बोर्ड परीक्षेसाठी प्रविष्ट झाले होते. त्यापैकी सर्व ६६ विद्यार्थी यशस्वी झाले आहेत. यामध्ये २९ विद्यार्थ्यांनी विशेष प्राविण्य मिळवले असून ३४ विद्यार्थ्यांनी प्रथम श्रेणी संपादन केली आहे. तसेच ३ विद्यार्थ्यांनी द्वितीय श्रेणीत यश मिळवले आहे. विद्यालयाच्या शैक्षणिक गुणवत्तेची ही अभिमानास्पद कामगिरी मानली जात आहे. तसेच विद्यालयाच्या प्राचार्या प्रिती दबडे यांनी विद्यार्थ्यांचे खूप कौतुक केले आहे.

विद्यालयातील गुणवंत विद्यार्थ्यांमध्ये वेदांत सचिन शेडगे यांने ९०.२०% गुण मिळवत प्रथम क्रमांक पटकावला. आयुष निलेश रावते यांने ८९% गुणांसह द्वितीय क्रमांक मिळवला, तर प्रसाद बबन बधाले यांने ८८.६०% गुण प्राप्त करून तृतीय क्रमांक मिळवला. सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे सर्व स्तरांतून अभिनंदन करण्यात येत आहे.

या यशामागे विद्यालयाच्या प्राचार्या प्रिती दबडे यांचे मार्गदर्शन तसेच सर्व शिक्षकवृंदांची अथक मेहनत महत्त्वाची ठरली. विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण तयारीसाठी अतिरिक्त तास, सराव परीक्षा, प्रश्नपत्रिका सोडविण्याचा सराव आणि नियमित मार्गदर्शन वर्गांचे आयोजन करण्यात आले होते. त्यामुळे विद्यार्थ्यांचा आत्मविश्वास वाढून त्यांना उज्ज्वल यश प्राप्त करता आले.

विद्यालयाच्या या उल्लेखनीय यशाबद्दल संस्थेचे उपाध्यक्ष राजेंद्र घाडगे साहेब मा.सचिव ॲड. संदीप कदम, उपसचिव एल. एम. पवार, सहसचिव ए. एम. जाधव तसेच सर्व पदाधिकारी यांच्याकडून विद्यार्थ्यांचे, प्राचार्या प्रिती दबडे, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे कौतुक करण्यात येत आहे. तसेच पालकांकडूनही विद्यालयाचे व विद्यार्थ्यांचे अभिनंदन होत आहे.
वेदांत शेडगे - प्रथम
आयुष रावते- द्वितीय
प्रसाद बधाले - तृतीय

Comments

Popular posts from this blog

पीडीइएचे इंग्लिश मीडियम सेकंडरी स्कूल व ज्यु.कॉलेज, आकुर्डी येथे 'टॉक ओव्हर कुकीज' इंटर-स्टेट कल्चरल एक्सचेंज प्रोग्रॅम यशस्वीरित्या संपन्न

आसु येथील युवकांचा शिवसेना शिंदे गटात जाहीर प्रवेश

सोनारी येथील भैरवनाथ शुगर गाळपासाठी सज्ज चेअरमन आनिल सावंत,