सराफ सुवर्णकार संरक्षण समितीच्या नवीन नियुक्त्या जाहीरपरंडा तालुका अध्यक्षपदी सुरेश श्रीहरी बागडे यांची निवड
सराफ सुवर्णकार संरक्षण समितीच्या नवीन नियुक्त्या जाहीर
परंडा तालुका अध्यक्षपदी सुरेश श्रीहरी बागडे यांची निवड
पुज्य नगरी ऑनलाईन न्यूज
परंडा ( दि १४ मे )
सराफ सुवर्णकार संरक्षण समितीच्या प्रदेशाध्यक्ष उमेश बोराडे यांच्या आदेशानुसार व धाराशिव जिल्हाध्यक्ष मधुकर शेळके यांच्या सूचनेनुसार धाराशिव जिल्ह्यातील विविध तालुक्यांसाठी नव्या पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या जाहीर करण्यात आल्या आहेत.
परंडा तालुका अध्यक्षपदी सुरेश श्रीहरी बागडे यांची तर तुळजापूर तालुका अध्यक्षपदी मंगेश हरि दीक्षित, वाशी तालुका अध्यक्षपदी दादासाहेब प्रभाकर वेदपाठक, धाराशिव तालुका उपाध्यक्षपदी प्रवीण मधुकर जेरे यांची निवड करण्यात आली आहे ,
नवीन पदाधिकाऱ्यांच्या निवडीमुळे सुवर्णकार समाजाच्या विविध प्रश्नांवर प्रभावीपणे काम होईल, तसेच संघटना अधिक मजबूत होण्यास मदत मिळेल, असा विश्वास जिल्हाध्यक्ष मधुकर शेळके यांनी व्यक्त केला.
यावेळी सराफ सरंक्षण समीती चे पदाधिकारी सदस्य मोठया संख्येने उपस्थित होते ,
नियुक्त झालेल्या सर्व पदाधिकाऱ्यांचे समाजबांधवांकडून अभिनंदन करण्यात येत असून, त्यांच्या पुढील सामाजिक व संघटनात्मक कार्यासाठी शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.
Comments
Post a Comment