बाशाभाई शहाबर्फीवाले यांच्या वाढदिवसानिमित्त परंड्यात भव्य मोफत नेत्रतपासणी शिबिर संपन्न



बाशाभाई शहाबर्फीवाले यांच्या वाढदिवसानिमित्त परंड्यात भव्य मोफत नेत्रतपासणी शिबिर संपन्न 

| परंडा | दि. २५ जुलै 
परंडा शहरातील माजी नगरसेवक बाशाभाई शहाबर्फीवाले यांच्या वाढदिवसानिमित्त सालाबादप्रमाणे यंदाही सामाजिक बांधिलकी जपत भव्य मोफत नेत्रतपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते ,

शिबिराचे उद्घाटन  मुख्याध्यापक अनंत सूर्यवंशी यांच्या हस्ते करण्यात आले. शिबिरात तब्बल ८० नागरिकांची मोफत नेत्रतपासणी करण्यात आली. यावेळी मोतीबिंदूची तपासणीही करण्यात आली असून, तपासणीनंतर ३५ रुग्णांची पुढील मोतीबिंदू शस्त्रक्रियेसाठी पुणे येथील बुधरानी नेत्र रुग्णालयात पाठविण्याची व्यवस्था करण्यात येणार असल्याची माहिती बाशाभाई शहाबर्फीवाले यांनी दिली.

वाढदिवसाचा अनावश्यक खर्च टाळून गरजू नागरिकांच्या आरोग्यासाठी सामाजिक उपक्रम राबविण्याच्या या उपक्रमाचे उपस्थितांनी कौतुक केले. वाढदिवस साजरा करण्याची ही समाजोपयोगी पद्धत नागरिकांसाठी प्रेरणादायी ठरत असून, सेवाभाव आणि सामाजिक बांधिलकीचा आदर्श निर्माण करणारी आहे, अशी भावना यावेळी व्यक्त करण्यात आली.
या कार्यक्रमाला परंडा शहरातील शैक्षणिक, सामाजिक, राजकीय आणि विविध क्षेत्रांतील मान्यवरांनी उपस्थित राहून बाशाभाई शहाबर्फीवाले यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. यावेळी नसीरभाई शहाबर्फीवाले, श्रीहरी नाईकवाडी, नंदू शिंदे, नगरसेवक अब्बास मुजावर,  बशीरभाई शेख, जलील जिक्रे, खालिब नायब, अक्रम पटेल, सिकंदर शेख, ईलाही शहाबर्फीवाले, फिरोज शेख, दिलीप रणबीर, संजय कोळगे, गणेश राशिनकर, मनोज कोळगे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.
शिबिरात बुधरानी नेत्र रुग्णालय, पुणे येथील नेत्रतज्ज्ञ डॉ. गिरीश पाटील आणि डॉ. कल्पना चव्हाण यांनी नागरिकांची नेत्रतपासणी करून आवश्यक मार्गदर्शन केले.
शिबिराच्या यशस्वी आयोजनासाठी सोहेल मुलाणी, जाहीर शहाबर्फीवाले आणि दशरथ गायकवाड यांनी विशेष परिश्रम घेतले.

Comments

Popular posts from this blog

सोनारी येथील भैरवनाथ शुगर गाळपासाठी सज्ज चेअरमन आनिल सावंत,

पावसाळी शालेय क्रीडा स्पर्धेत ज्ञानोद्योग विद्यालयाच्या विद्यार्थ्यांचे यश

ऑनलाईन औषध विक्रीविरोधात परंड्यात मेडिकल दुकाने बंद