अजितदादा पवार यांच्या जयंतीनिमित्त आकुर्डी येथे सामाजिक विविध उपक्रम संपन्न
कै. अजितदादा पवार यांच्या जयंतीनिमित्त आकुर्डी येथे सामाजिक विविध उपक्रम संपन्न
पुज्य नगरी ऑनलाईन न्यूज
पुणे आकुर्डी (ता.२३ )
पीडीईएचे इंग्लिश मीडियम सेकंडरी स्कूल अँड ज्युनिअर कॉलेज, आकुर्डी येथे महाराष्ट्राचे माजी उपमुख्यमंत्री तथा पुणे जिल्हा शिक्षण मंडळाचे माजी अध्यक्ष कै. मा. अजितदादा पवार यांच्या जयंतीनिमित्त सामाजिक जाणीव जागृत करणाऱ्या विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले.
या निमित्ताने वृक्षारोपण, आरोग्य तपासणी शिबिर, रांगोळी स्पर्धा, वक्तृत्व स्पर्धा तसेच कला व हस्तकला प्रदर्शन अशा विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले. विद्यार्थ्यांनी या सर्व उपक्रमांत सहभाग नोंदवत समाजसेवा, पर्यावरण संवर्धन आणि सृजनशीलतेचा संदेश प्रभावीपणे दिला.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी हेमा फाउंडेशनचे सुंदर अय्यर हे मान्यवर म्हणून लाभले. त्यांच्याहस्ते विविध स्पर्धांतील विजेत्या विद्यार्थ्यांना बक्षिसांचे वितरण करण्यात आले. तसेच आदरणीय दादांच्या प्रथम स्मृतीदिनी त्यांच्या राजकीय व सामाजिक कार्याचा वारसा पुढे चालवण्यासाठी विद्यार्थ्यांना आदरणीय दादांच्या कार्याची उजळणी म्हणून विविध प्रकारचे उपक्रम, स्पर्धा व प्रदर्शन शाळेमध्ये भरवण्यात आले. त्यामधून दादांच्या कार्याची ओळख करून देण्यात आली. तसेच शाळेच्या प्राचार्या प्रिती दबडे यांनी आदरणीय दादांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले व शाळेतील सर्व शिक्षकवृंद व शिक्षकेत्तर कर्मचारी यांनीही विनम्र अभिवादन केले.
Comments
Post a Comment