स्व.अजितदादा पवार यांची जयंती पीडीईएचे इंग्लिश मीडियम प्रायमरी स्कूल, आकुर्डी येथे उत्साहात साजरी
स्व.अजितदादा पवार यांची जयंती पीडीईएचे इंग्लिश मीडियम प्रायमरी स्कूल, आकुर्डी येथे उत्साहात साजरी
पुज्य नगरी ऑनलाईन न्यूज
पुणे आकुर्डी:
स्व.अजितदादा पवार यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या जीवनकार्याला, समाजसेवेला आणि नेतृत्वगुणांना अभिवादन करण्यासाठी पीडीईएच्या इंग्लिश मीडियम प्रायमरी स्कूल, आकुर्डी येथे विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. मुख्याध्यापिका सौ.प्रिती दबडे मॅडम यांच्या मार्गदर्शनाखाली हा कार्यक्रम उत्साह साजरा करण्यात आला.
विद्यार्थ्यांना स्व.अजितदादा पवार यांच्या आदर्शांपासून प्रेरणा मिळावी या उद्देशाने इयत्ता पहिली आणि दुसरीच्या विद्यार्थ्यांसाठी चित्रकला स्पर्धा व तिसरी आणि चौथीच्या विद्यार्थ्यांसाठी रांगोळी स्पर्धा घेण्यात आल्या.
पर्यावरणाविषयी जागृता वाढवण्यासाठी प्लास्टिक संकलन आणि वृक्षारोपणाच्याही कार्यक्रमासाठी इयत्ता पहिली ते चौथीच्या सर्व विद्यार्थ्यांनी उस्फूर्तपणे सहभाग घेतला. कार्यक्रमाच्या समारोपाला चित्रकला व रांगोळीचे प्रदर्शन भरवण्यात आले होते. या प्रदर्शनाचे उद्घाटन हेमा फाउंडेशनचे संस्थापक श्री. सुंदर अय्यर यांच्याहस्ते झाले. या प्रदर्शनाचे विशेष आकर्षण म्हणजे इयत्ता तिसरी व चौथीच्या विद्यार्थ्यांनी बनवलेल्या मातीची भांडी व पेपर कप पासून तयार केलेल्या कलाकृतींचे प्रमुख पाहुण्यांनी विशेष कौतुक केले.
Comments
Post a Comment