स्वातंत्र्य दिनी विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर फुलले हास्य; बागवान सोशल फाउंडेशनचा स्तुत्य उपक्रम


स्वातंत्र्य दिनी विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर फुलले हास्य; बागवान सोशल फाउंडेशनचा स्तुत्य उपक्रम

आलिपूरच्या शाळा क्रमांक १९ मधील विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य व खाऊचे वाटप
पुज्य नगरी ऑनलाईन न्यूज 

बार्शी : ( शनिवार दि १५ ऑगष्ट )  ८०व्या स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधत बागवान सोशल फाउंडेशनच्या वतीने आलिपूर येथील शाळा क्रमांक १९ मधील सर्व विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य व खाऊचे वाटप करण्यात आले. सामाजिक बांधिलकी जपत राबविण्यात आलेल्या या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर आनंद फुलला.
कार्यक्रमाची सुरुवात प्रमुख अतिथींच्या हस्ते ध्वजारोहण व राष्ट्रगीताने झाली. त्यानंतर उपस्थित मान्यवर, फाउंडेशनचे पदाधिकारी तसेच विद्यार्थ्यांनी मनोगत व्यक्त केले. स्वातंत्र्य दिनाचे महत्त्व सांगत विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी प्रोत्साहन देण्यात आले.
कार्यक्रमाच्या शेवटी विद्यार्थ्यांना खाऊ तसेच शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले. शिक्षणाला प्रोत्साहन आणि सामाजिक बांधिलकीचा संदेश देणारा हा उपक्रम उपस्थितांकडून कौतुकास्पद ठरला.
यावेळी मुख्याध्यापिका नलावडे मॅडम, कृषी सहाय्यक अधीक्षक गणेश देशपांडे, रेखा कदम, संगीता मोराळे, जुबेरभाई येडशीकर, संगीता पवार, सुनंदा चव्हाण, पत्रकार घोडके, तसेच बागवान सोशल फाउंडेशनचे सचिव कदिरभाई बागवान, उपाध्यक्ष अन्वर बागवान यांच्यासह फाउंडेशनचे प्रमुख सदस्य, पालक, शिक्षक व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Comments

Popular posts from this blog

सोनारी येथील भैरवनाथ शुगर गाळपासाठी सज्ज चेअरमन आनिल सावंत,

ऑनलाईन औषध विक्रीविरोधात परंड्यात मेडिकल दुकाने बंद

अनुसूचित जाती आरक्षणाचे उपवर्गीकरण करा; अन्यथा आंदोलन लहुजी शक्ती सेनेचा इशारा ,