शिस्तीचे पालन करा.” कोरोना जनजागृती रॅलीत मा. पोलीस अधीक्षकांचे आवाहन.



सा पुज्य नगरी, उस्मानाबाद (online news) दि २३ एप्रील 
 
 कोरोना  (कोविड- 19) या साथीच्या, संसर्गजन्य आजाराविरुध्द समाजात जनजागृती व्हावी, लॉकडाउन संबंधी नियमांचे पालन व्हावे. या उद्देशाने उस्मानाबाद जिल्हा प्रशासना तर्फे आज दि. 23. रोजी 11.00 वा. उस्मानाबाद शहरात जनजागृती रॅलीचे आयोजन करण्यात आले होते .

 या प्रसंगी जिल्हाधिकारी- श्रीमती दिपा मुधोळ, मा. पोलीस अधीक्षक राज तिलक रौशन, अपर पोलीस अधीक्षक  संदीप पालवे, जिल्हा परिषद, मुख्य कार्यकारी अधिकारी . संजय कोलते, पोलीस उपअधीक्षक मोतीचंद राठोड, पो.नि. दगुभाई शेख, उमाकांत कस्तुरे, धरमसिंग चव्हाण, सतिश चव्हाण इत्यादी हजर होते.

 छत्रपती शिवाजी महाराज चौक येथुन रॅली सुरु होउन वाहने देशपांडे स्टँड- शम्स चौक- जिल्हा सामान्य रुग्णालय- समता कॉलनी- मध्यवर्ती इमारत यामार्गे फिरुन पुन्हा छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे रॅलीची सांगता झाली. रॅली दरम्यान वाहन ताफा शहरातील मुख्य वस्त्या- चौक येथे थांबत होता. या ठिकाणी मा. जिल्हाधिकारी सो तसेच मा. पोलीस अधीक्षक सो यांनी ध्वनीक्षेपकावरुन जनतेस संबोधीत करुन लॉकडाउन काळातील नियम- बंधने, दंडात्मक कारवाई, सोशल डिस्टन्सींग, यात जनतेची भुमीका आणि जबाबदारी या विषयी माहिती देउन जनतेने पोलीस प्रशासनास सहकार्य करण्याचे आवाहन केले. 
 
 

Comments

Popular posts from this blog

आसु येथील युवकांचा शिवसेना शिंदे गटात जाहीर प्रवेश

जातीवाचक शिवीगाळ ९ जनाविरुद्ध ऑट्रॉसिटी चा गुन्हा दाखल

पीडीइएचे इंग्लिश मीडियम सेकंडरी स्कूल व ज्यु.कॉलेज, आकुर्डी येथे 'टॉक ओव्हर कुकीज' इंटर-स्टेट कल्चरल एक्सचेंज प्रोग्रॅम यशस्वीरित्या संपन्न