कर्तव्यदक्ष गट विकास आधिकारी चकोर यांचा सत्कार तर नुतन गटविकास आधिकारी तायडे यांचे स्वागत
पुज्य नगरी ( दि २२ )
परंडा पंचायत समीतीचे कर्तव्य दक्ष गटविकास आधीकारी रावसाहेब चकोर यांची बदली झाल्याने दि २२ रोजी पंचायत समिती कार्यालयात छोटेखानी निरोप समारंभ घेण्यात आला यावेळी पुज्य नगरी चे संपादक निसार मुजावर यांनी पुष्प गुच्छ देऊन निरोप देण्यात आला , तर नुतन गटविकास आधिकारी सुरेश तायडे यांचे स्वागत करण्यात आले .
या वेळी ग्रामसेवक संघटणेचे अध्यक्ष यू .डी खरात , विस्तार आधिकारी जे .टी वग्गे , शिवसेना तालूका अध्यक्ष आण्णासाहेब जाधव , ग्रामसेवक संघटनेच्या उपाध्यक्ष श्रीमती आगरकर , मेघराज गायकवाड ,यांच्या सह कर्मचारी उपस्थित होते ,
गट विकास आधिकारी रावसाहेब चकोर हे शांत स्वभावाचे जरी असले तरी कामात पारदर्शकता , शिस्त बद्ध असल्याने त्यांचा कर्मचारी वर्गावर दरारा होता , चुकीच्या कामाची शिफारफ करण्याचे धाडस राजकीय पुढारी देखील करत नव्हते त्यांच्या परंडा येथील कार्यकाळात जनतेचे कामे विना वशील्याने केले , तर सर्व सामान्य जनतेची तक्रारीची दखल घेऊन त्यांना न्याय दिला .
रावसाहेब चकोर यांच्या पुढील वाटचालीस सुभेच्छा - त्यांच्या हातुन अशीच देश सेवा घडत राहो हीच ईच्छा -
Comments
Post a Comment