उत्तरप्रदेश मधील बलात्कार व हत्या प्रकरणातील आरोपींना फासी देण्याची मागणी - बार्शीच्या तहासिलदार यांना निवेदन


पुज्य नगरी ( बार्शी  प्रतिनिधी तानाजी घोडके )

उत्तरप्रदेश मधील हाथरास येथे घडलेल्या सामूहिक बलात्कार व खून प्रकरणामुळे संपूर्ण देश हादरला असून आरोपींना  कडक शासन व्हावे, उत्तरप्रदेश मध्ये राष्ट्रपती राजवट लागू करावे  अशी मागणी सर्व पक्षीयच्या वतीने बार्शी तहसिलदार यांना दिलेल्या  निवेदना द्वारे करण्यात आली आहे .

 तहसिलदार यांना दि ९ ऑक्टोबर रोजी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की  पीडित मनीषा वाल्मिकीची अत्याचार प्रकरणाची  सी.बी.आय. मार्फत चौकशी करण्यात यावी, पीडितेच्या कुटुंबाला संरक्षण देण्यात यावे, आरोपींना तात्काळ अटक करून फाशीची शिक्षा देण्यात यावी तसेच , ऑक्ट्रासिटी कायदा आणखी कडक करण्यात यावा, 
तसेच महिला अयोगामध्ये दलित महिलेची नेमणूक करण्यात यावी. ईत्यादी मागण्या करण्यात आल्या आहे

Comments

Popular posts from this blog

आसु येथील युवकांचा शिवसेना शिंदे गटात जाहीर प्रवेश

जातीवाचक शिवीगाळ ९ जनाविरुद्ध ऑट्रॉसिटी चा गुन्हा दाखल

पीडीइएचे इंग्लिश मीडियम सेकंडरी स्कूल व ज्यु.कॉलेज, आकुर्डी येथे 'टॉक ओव्हर कुकीज' इंटर-स्टेट कल्चरल एक्सचेंज प्रोग्रॅम यशस्वीरित्या संपन्न