Posts

बालीकेवर अत्याचार करणाऱ्या अरोपीला फाशी देण्याची मागणी

Image
नसरापूर अत्याचार प्रकरण पेटलं! आरोपीला फाशीची मागणी  वकिलांनी केस न घेण्याचं आवाहन पुणे (प्रतिनिधी शंकर जोग )    भोर तालुक्यातील नसरापूर येथे अल्पवयीन मुलीवर झालेल्या अमानुष अत्याचार आणि खुनाच्या घटनेने संपूर्ण राज्य हादरले असून, संतापाची लाट उसळली आहे. या पार्श्वभूमीवर पुण्यात शिवसेना (शिंदे गट) आक्रमक झाली असून, आरोपीला कठोरात कठोर शिक्षा देण्याची जोरदार मागणी करण्यात आली आहे. शिवसेनेच्या वतीने पुणे बार असोसिएशनचे अध्यक्ष ॲड. काळूराम भुजबळ यांना निवेदन देत, “आरोपीचे वकीलपत्र कोणत्याही वकिलांनी स्वीकारू नये” असे आवाहन करण्यात आले. या घटनेमुळे समाजात तीव्र संताप असून, आरोपीला लवकरात लवकर मृत्यूदंडाची शिक्षा सुनावण्यात यावी, अशी ठाम भूमिका मांडण्यात आली.  या निवेदनावेळी शिवसेनेचे पुणे शहर समन्वयक शंकर संगम, श्रमिक राष्ट्रीय कामगार सेनेचे शहर प्रमुख रोहित उर्फ बापू कसबेकर, शिक्षक सेनेचे जिल्हा प्रमुख अनिल गडकरी, उपशहर प्रमुख सुनील जाधव, संजय डोंगरे, शहर संघटक अनिल बटाने, निलेश जगताप, मागासवर्गीय शहर प्रमुख महेंद्र गायकवाड यांच्यासह पदाधिकारी मोठ्या संख्येने...

परंड्यात नव्या सीए कार्यालयाचा शुभारंभ

Image
परंड्यात नव्या सीए कार्यालयाचा शुभारंभ; तरुण व्यावसायिकाला मोठा प्रतिसाद पुज्य नगरी ऑनलाईन न्यूज  परांडा :( )  शहराच्या व्यावसायिक क्षेत्रात आणखी एक नवे पाऊल पडत, चार्टर्ड अकाउंटंट आवेज शेख यांच्या कार्यालयाचा शुभारंभ उत्साहात पार पडला. परंडा तालुक्यातील वडनेर येथील रहिवासी आणि बार्शीच्या शिवाजी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. अब्दुल शेख यांचे सुपुत्र असलेल्या आवेज शेख यांनी आपल्या व्यावसायिक कारकिर्दीची सुरुवात परंडा शहरातून केली आहे. या नव्या सीए कार्यालयाचे उद्घाटन शिवाजी शिक्षण प्रसार मंडळाचे जॉईंट सेक्रेटरी अरुण देबडवारकर, परंडा शहराचे नगराध्यक्ष जाकीर सौदागर तसेच सुप्रसिद्ध अडत व्यापारी बाबा बहिरे यांच्या हस्ते करण्यात आले. कार्यक्रमाला परंडा शहरातील व्यापारी, नगरसेवक व मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते. उपस्थितांनी आवेज शेख यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देत त्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी विश्वास व्यक्त केला. विशेष म्हणजे, आवेज शेख हे परंडा नगर परिषदेचे नगरसेवक वाजीद दखनी यांचे भाचे असून, त्यांच्या या यशामुळे स्थानिक पातळीवर आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे...

कैवल्य रमेश वैद्य गुरुजी यांना “डॉ.” पदवी प्रदान

Image
 परंडा येथील कैवल्य रमेश वैद्य गुरुजी यांना “डॉ.” पदवी प्रदान पुज्य नगरी ऑनलाईन न्यूज  नवी दिल्ली (प्रतिनिधी): पं. दीनदयाल उपाध्याय हिन्दी विद्यापीठ, वृंदावन धाम (मथुरा, उ.प्र.) यांच्या तर्फे आयोजित “राष्ट्रीय हिन्दी संगोष्ठी एवं सम्मान समारोह” या कार्यक्रमात आज परंडा येथिल कैवल्य वैद्य गुरुजी यांना “डॉ.” (Doctorate – विद्यावाचस्पती) पदवी प्रदान करण्यात आली. हा कार्यक्रम रविवार, दिनांक 26 एप्रिल 2026 रोजी सकाळी 10.30 ते दुपारी 2.30 या वेळेत होटल रेडिसन ब्लू, पश्चिम विहार, नवी दिल्ली येथे संपन्न झाला. या कार्यक्रमासाठी विविध मान्यवरांची उपस्थिती लाभली होती. कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून मा. प्रा. सुधीर कुमार आर्य (जवाहरलाल नेहरू विद्यापीठ, नवी दिल्ली), अध्यक्षस्थानी मा. डॉ. इंदु भूषण मिश्रा (कुलपती, पं. दीनदयाल उपाध्याय हिन्दी विद्यापीठ) तसेच प्रमुख वक्ते म्हणून मा. डॉ. रेखा चौहान (शिक्षण संचालनालय, नवी दिल्ली) यांची उपस्थिती लाभली. याशिवाय शैक्षणिक व सांस्कृतिक क्षेत्रातील अनेक विद्वान उपस्थित होते. कैवल्य वैद्य गुरुजी हे गेल्या चार पिढ्यांपासून चालत आलेल्या पौर...

मायेचा एक घास: जवानांसाठी शुभेच्छापत्र स्पर्धेत पीडीइएचे इंग्लिश मीडियम सेकंडरी स्कूल अँड ज्युनिअर कॉलेज आकुर्डी शाळेचा गौरव, 84 विद्यार्थ्यांचा सहभाग

Image
* मायेचा एक घास: जवानांसाठी शुभेच्छापत्र स्पर्धेत पीडीइएचे इंग्लिश मीडियम सेकंडरी स्कूल अँड ज्युनिअर कॉलेज आकुर्डी शाळेचा गौरव,  84 विद्यार्थ्यांचा सहभाग पुज्य नगरी ऑनलाईन न्यूज आकुर्डी  आधार सोशल ट्रस्टने आयोजित केलेल्या “मायेचा एक घास भारतीय जवानांसाठी” या उपक्रमांतर्गत राज्यस्तरीय ग्रीटिंग कार्ड स्पर्धेत पीडीईएचे इंग्लिश मीडियम सेकंडरी स्कूल अँड ज्युनियर कॉलेज, आकुर्डीच्या विद्यार्थ्यांनी उत्कृष्ट कामगिरी केली. हा कार्यक्रम १८ एप्रिल २०२६ रोजी संपन्न झाला. या स्पर्धेत शाळेतील ८४ विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला. उत्कृष्ट कामगिरीबद्दल शाळेचा विशेष गौरव करण्यात आला. इयत्ता सातवीतील विद्यार्थी यशराज शरद पोटले याला उत्तेजनार्थ पारितोषिक मिळाले. कार्यक्रमास बीएसएफ असिस्टंट कमांडंट प्रतिक वशिष्ठ, राष्ट्रसेवा दल संचालित शिक्षण प्रसारक मंडळाचे सचिव शिवाजी खाडेकर व नगरसेविका जयश्रीताई भूमकर हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. त्यांच्या हस्ते पारितोषिक वितरण झाले. या उपक्रमासाठी शाळेच्या कला शिक्षिका विद्या गजरे यांच्या अनमोल मार्गदर्शनाखाली विद्यार्थ्यांनी सहभा...

PDEA's English Medium Secondary School and Jr.College, Akurdi, Pune stands amongst top 10 schools

Image
* PDEA's English Medium Secondary School and Jr.College, Akurdi, Pune stands amongst top 10 schools*  Pujya nagri online news  Pune  Classrooms to Climate Action Crusaders: Young Minds Leading India’s Sustainability Movement Inspired by environmentalist James Gustave Speth’s powerful insight that the greatest environmental challenges stem from human values like selfishness and apathy, a transformative initiative is reshaping how young people engage with climate action in India. “Classrooms to Climate Action Crusaders” is a pioneering, collaboration-based competition that empowers students to move beyond awareness and become active environmental stewards. Bringing together 78 schools, the initiative demonstrates that meaningful climate action can begin in classrooms and extend into communities. Launched in July 2025 and concluded in December 2025, the program is a joint effort by the Kerala Public School Trust, Jamshedpur, Rotary Club of Jamshedpur,...

अलाईव्ह चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने 'चला चिऊ वाचवू' या अभियानांतर्गत विविध स्पर्धा संपन्न

Image
अलाईव्ह चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने 'चला चिऊ वाचवू' या अभियानांतर्गत विविध स्पर्धा संपन्न  पुज्य नगरी ऑनलाईन न्यूज़   अलाईव्ह चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने 'चला चिऊ वाचवू' या अभियानांतर्गत विविध वयोगटांसाठी चित्रकला' रांगोळी, कथा लेखन, कविता लेखन, इत्यादी स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेचा 'चिमणी पुरस्कार वितरण सोहळा' रविवार दिनांक 15 मार्च २०२६ रोजी पिंपरी चिंचवड सायन्स पार्क 'चिंचवड' पुणे येथे पार पडला. या सोहळ्यासाठी माननीय श्री. प्रवीण तुपे, संस्थापक, संचालक पिंपरी चिंचवड मुख्य अतिथी म्हणून लाभले. डॉ. श्रद्धा खंपरिया मुख्य कार्यकारी अधिकारी, पिंपरी चिंचवड सायन्स पार्क यांची सुद्धा विशेष उपस्थिती होती. तसेच माननीय श्री. पियुष सेकसरिया यांचे 'द  व्हेन अंड व्हाय ऑफ वर्ड्स क्रॅशिंग इंटू विंडोज' या विषयावर विशेष व्याख्यान झाले. 'चला चिऊ वाचवू' या अभियानांतर्गत दहा वर्षाखालील विद्यार्थ्यांसाठी चित्रकला स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेमध्ये पुणे जिल्हा शिक्षण मंडळाच्या इंग्लिश मीडियम प्रायमरी स्कूल, आकुर्डी...

अनुसूचित जाती आरक्षणाचे उपवर्गीकरण करा; अन्यथा आंदोलन लहुजी शक्ती सेनेचा इशारा ,

Image
अनुसूचित जाती आरक्षणाचे उपवर्गीकरण करा; अन्यथा आंदोलन लहुजी शक्ती सेनेचा इशारा ,  पुज्य नगरी औनलाईन न्यूज  परंडा ( दि १६ मार्च )  तालुक्यात लहुजी शक्ती सेनेने अनुसूचित जाती आरक्षणाच्या उपवर्गीकरणासाठी जोरदार मागणी करत सरकारचे लक्ष वेधले आहे. सोमवार दि. १६ मार्च  रोजी लहुजी शक्ती सेना परंडा तालुका व शहर यांच्या वतीने मुख्यमंत्री यांना तहसील कार्यालय परंडा मार्फत निवेदन देण्यात आले. या निवेदनामध्ये न्यायमूर्ती अनंत बदर समितीचा अहवाल तात्काळ स्वीकारून अनुसूचित जाती आरक्षणाचे उपवर्गीकरण लागू करावे, अशी ठाम मागणी करण्यात आली. तसेच कु. अनुष्का पाटोळे आणि आकांक्षा गायकवाड या मुलींच्या मृत्यूची न्यायालयीन चौकशी करून संबंधित आरोपींना तात्काळ अटक करावी, अशीही मागणी लहुजी शक्ती सेनेने केली आहे. या वेळी लहुजी शक्ती सेना परंडा तालुका अध्यक्ष लक्ष्मण चव्हाण, महिला आघाडी तालुकाध्यक्ष राजश्री चव्हाण, सामाजिक कार्यकर्ते गुलाब शिंदे, संपर्कप्रमुख युवराज कसबे, सुमित दुबळे, उमेश कसबे, तुकाराम शिंदे, धनाजी अडगळे, कोर कमिटी अध्यक्ष गणेश शिंदे, सुनील दणाने, विमल चव्हाण, सोनवणे ...